पंचकर्म उपचार कसे कार्य करतात ??? : सहज सोपे सरळरित्या
मराठी व्याकरण आठवतयनं??? त्यात जसे आपण समास शिकलोय तसाच पंचकर्म हा सामासिक शब्द तयार झालाय. पंचकर्म म्हणजे पाच कर्मांचा समूह. ते कोणते तर अनुक्रमे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. ह्यांचे फायदे नुकसान, कोणी कारावे कोणी करु नये हे वेगळ्या ब्लॉग मध्ये सविस्तर बघू. आजच्या विषयला धरुन पुढे जाऊ.
कुठला ही पदार्थ किंवा पाककृती करतांना त्याला जसे पूर्व तयारी, कृती आणि नंतरची आवरावर असते तसेच पंचकर्म ह्या विधीला सुद्धा पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि उत्तरकर्म किंवा पश्चात कर्म असतात.
पंचकर्माचा समावेश उपयोग आयुर्वेदात शोधण चिकित्सा म्हणून मुख्यत्वे वर्णन केलं आहे. शोधण म्हणजे नेमके काय तर शरीरातील दूषित पदार्थ म्हणजे दोष बाहेर काढणे. पण ह्याची गरज काय? हेच दोष शरीरात राहून व्याधी घटक म्हणून कार्य करतात आणि व्याधी निर्मिती घडून आणतात. त्यामुळे ह्यांना म्हणजेच दोषांना शोधण क्रिया (पंचकर्माद्वारे ) बाहेर काढणे गरजेचे आहे.
पूर्वकर्म:
कुठलेही मोठे कार्य करतांना त्याची आपण पूर्व तयारी करतो, तसेच पंचकर्म करतांना पूर्वकर्म करणे तेवढीच गरजेचे असते.
पूर्वकर्ममध्ये दोन गोष्टी महत्वाच्या त्यात समाविष्ट आहेत 1. स्नेहन आणि 2. स्वेदन .
स्नेहन : स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ. शरीरात स्निग्ध पदार्थ प्रविष्ट करणे म्हणजे स्नेहन . हे करायला दोन मार्गाद्वारे शरीरात प्रविष्ट केले जाते. १ . बाह्य मार्ग २.अभ्यांतर मार्ग
बाह्य स्नेहन : शरीरावर बाहेरुन तेल आदि स्निग्ध पदार्थ लावून ते जिरेल अशा पद्धतीने हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळणे म्हणजे बाह्य स्नेहन.
अभ्यांतर स्नेहन : पचेल एवढ्या मात्रेत स्नेह पिणे व तो वर्धमान मात्रेत प्रती दिवस वाढवणे या प्रक्रियेला अभ्यांतर स्नेहन म्हणतात. साध्या सोप्या भाषेत तूप पिणे.
स्वेदन : शरीराला उष्ण उपचारांनी स्वेद म्हणजे घाम आणण्या क्रियेला स्वेदन असे म्हणतात. ही क्रिया औषधी काढ्याला तापवून त्याच्या वाफेणी केली जाते.
वरील दोन्ही कर्म रोज ३, ५ किंवा ७ दिवस वैद्य तुमची प्रकृती, वय, अवस्था , अग्नि, दोष, बल यांचा विचार करुन ठरवतात.
पण स्नेहन आणि स्वेदन कशासाठी ?
वरील दोन्ही उपक्रम हे शरीरातील घट्ट चिकटलेले व लीन झालेले दोषांना द्रवीत करुन सुट्टे करायला मदत करते. त्यामुळे दोष हे कोष्ठात आणावायस मदत करतात. जेणे करुन ते जवळच्या बाह्या मार्गाने शरीरा बाहेर काढले जातील अगदी सहज रित्या.
दोनही प्रकारचे स्नेहन आणि स्वेदन हे पूर्वकर्म प्रामुख्याने वमन, विरेचन, रक्तमोक्षण पूर्वी आवश्यक रित्या केले जाते. तर बस्ती आणि नस्य कर्म करण्या पूर्वी बाह्या स्नेहन आणि स्वेदन आवश्यक असते.
प्रधान कर्म किंवा मुख्य कर्म :
हा प्रधान कर्म विधी एका दिवसाचा असतो. या मध्ये कोष्ठात आणलेले दोष जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात. जसे,
वमन – आमाशयात आलेले दोष ऊर्ध्व मार्गाने तोंड वाटे उलटीद्वारे
विरेचन – पक्वाशयात आलेले दोष अधोमार्गाने शौचा वाटे जुळबाद्वारे
बस्ती – पक्वाशयात असलेले दोष बस्ती औषधांद्वारे शौचा वाटे शरीरात प्रविष्ट करुन अधोमार्गाने बाहेर काढले जातात
रक्तमोक्षण – रक्तामधील दोष सिराद्वारे जलौका किंवा syringe च्या सहाय्याने
नस्य – शिर व त्याच्या संलग्न अवयव मधील दोष नाका वाटे बाहेर काढले जातात
पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म :
मुख्य कर्म व्यवस्थितरीत्या पार पाडल्यावर केली गेलेली आहार योजना हे पश्चात कर्मात येते. प्रधान करमानंतर येणारा थकवा आणि पुनः शरीर बल वाढवण्यासाठी आहार हा महत्वाचा भाग असतो. तो सहज पणे पाचवा या साथी प्रथम कोष्ण जलपान, कढण, पातळ पेज, खिचडी आणि मग भाकरी भाजी अशी उपाययोजना केली जाते . या प्रक्रियेला साधारण ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो.
पश्चातकर्म किंवा उत्तरकर्म यांची आवश्यकता :
पंचकर्म नंतर शरीर बल हे अल्प असते व अग्नि किंचित मंद झालेला असतो त्यामुळे त्यावर लगेच पचायला जड असे पदार्थ सेवन केल्यास बलहानी होऊन उपद्रव स्वरूप नवीन व्याधी उत्पत्ति होऊ शकते. ते टाळण्यासाठी हा उपक्रम. आणि ह्या विधीने पंचकर्म केलयवर आहार सेवनाने अल्प जे दोष शरीरात राहतात त्यांचे देखील पाचण होण्यास मदत होते.
अशा प्रकारे संपूर्ण विधिने केलेले पंचकर्म शरीरातील दोष बाहेर काढून तुमचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते.
Recent Comments