चेहरा हा सौंदर्याचा एक प्रतीक आणि अभिव्यक्तीचं स्थान आहे. चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्यावर दिसून येतात. जसे की थकवा असल्यास चेहराम्लान दिसतो. त्यमुळे चेहर्यवार कुठलेही डाग किंवा मुरुम पुटकळया हा लोकांना काळजीचा विषय होतो. कारण त्यामुळे त्यांना कुठे तरी आत्मविश्वास कमी झालेला वाटतो. आणि प्रत्येक व्यक्तिला आयुष्यात कधी तरी मुरुम पुटकूळ्या यांनी भेदावलेले असते.
मुरुम किंवा पुटकूळ्या प्रामुख्याने पौगंडावस्थेत चेर्यावर येतात आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. पण काही चुकीच्या खान-पान च्या सवयींमुळे त्यांचे प्रमाण कमी न होता वाढते व त्यांचे एक त्वचा विकारात रूपांतर होते. आधुनिक औषध शस्त्रानुसार त्यावर काही अॅंटीबायोटिक्स आणि आणि चेहर्याला लावला क्रीम सांगितल्या जातात; ज्यांचा ठराविक काळपुरता परिणाम दिसून येतो. मात्र आयुर्वेदानुसार मुरुम किंवा पुटकूळ्या यांची चिकित्सा करतांना सर्वांगीण गोष्टींचा विचार करुन केली जाते. या लेखामध्ये आपण मुरुम आणि पुटकूळ्या उत्पन्न होण्याची कारणे, त्यांचे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार, तसेच योग्य असा आहार आपण बघणार आहोत.
परिचय :
मुरुम आणि पुटकूळ्या या साधारणपणे पौगंडावस्थेत चेर्यावर येण्यास सुरुवात होते आणि कालांतराने त्यांचे प्रमाण कमी होते. काही अवस्थेत यावर योग्य असे औषध उपचार घ्यावे लागतात. हे प्रामुख्याने त्वचाविकार असण्याची शक्यता असते. प्रौढावस्थेत याचे करणे हॉर्मोन्स, मानसिक ताण आणि त्वचेची अयोग्य काळजी न घेणे यामुळे जास्त प्रमाणात होतात.
आयुर्वेदिक मत :
आधी सांगितल्या प्रमाणे, चेहरा तुमचे आरोग्य आणि पाचन तंत्र याचा देखील समर्पक असा विश्लेषण करुन देणारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यावर त्याचे पडसाद हे चेहर्यावर दिसून येतात. याचे कारण असे की चेहरा हा रस, रक्त, मांस आणि शुक्र धातु यांचे स्थान आहे. आणि याच धातूंमध्ये दोष म्हणजे वात , पित्त आणि कफ यांचा प्रादुर्भाव वाढला की मुरूम आणि पुटकुळ्या निर्माण होतात.
चेहर्यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्याची कारणे :
- होर्मोन्स मध्ये होणारे बदल
- पोटाचे विकार
- पाचन तंत्रातील बिघाड
- चिरकाळ असणारी अॅसिडीटी
- अपुरी झोप
- बाहेरचे आणि अयोग्य खाद्य पदार्थ
- त्वचेची काळजी न घेणे
इत्यादि सर्व करणे हे चेहर्यावरील मुरुम आणि पुटकळ्या येण्यासाठी करणीभूत ठरतात.
मुरुम आणि पुटकुळ्या यांचे आयुर्वेदिक निदान :
- युवान पीडिका
- मुख दूषिका
- क्षुद्र कुष्ठ
- रक्तदुष्टि
मुरुम आणि पुटकुळ्या साठी असे काही आयुर्वेदिक निदान करतांना येतात.
मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक चिकित्सा:
कुठल्याही व्याधीची चिकित्सा करतांना त्याचा सर्वांगीण विचार करावा हे आयुर्वेद शास्त्राची चिकित्सा पद्धती आहे. ही चिकित्सा पद्धत मुरुम आणि पुटकुळ्या साठी सुध्दा लागू आहे. नुसतं चेहर्यावर क्रिम लावून किंवा लेप लावणे ही मुरुम आणि पुटकुळ्या साठी चिकित्सा नाही. तर योग्य निदान करुन आयुर्वेदिक औषधे सोबतच पंचकर्म उपचार, लेप आणि योग्य आहार- विहार अशी मुरुम आणि पुटकुळ्यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा अवलंबली जाते.
मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक औषधे:
सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी औषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)
- लघुमंजिष्ठादी काढा 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
- सिरप साफी 10 मि.लि. समभाग पाण्यासह दोन्ही वेळा जेवणानंतर
- सरिवादी वटी 250 मि. ग्राम दिवसातून 2 वेळा
- त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासह (कोष्ठानुसार )
मुरुम आणि पुटकुळ्या साठी आयुर्वेदिक बाह्य लेप चिकित्सा :
सर्व सामान्य पणे लागू पडतील अशी लेपऔषधे आम्ही सांगत आहोत, (तरी कृपया तज्ञ आयुर्वेदिक डोक्टरांचा सल्ला घ्यावा)
- घरघुती साधा सोपा लेप: हळद पावडर + निंब पान चूर्ण + गुलाब पाकळी चूर्ण + मुलतानी माती सर्व समभाग घेणे. आणि आवश्यक तेवढे चूर्ण घेऊन पाणी किंवा गुलाब पाण्यात मिसळून त्याचा लेप करणे.
- रजनी लेप
- रक्त चन्दनादी लेप
मुरुम आणि पुटकुळ्यासाठी पंचकर्म उपचार :
वमन हे आमाशय मधील सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रस धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त कफ जो की मुरुम आणि पुटकुळ्या निर्माण करण्यास करणीभूत ठरतो.
विरेचन ही जठर आणि आतड्यांमध्ये सर्व विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रक्त धातूची निर्मिती आणि कार्य सुधारते. तसेच शरीरात साठलेला अतिरिक्त पित्त बाहेर काढते जे की मुरुम आणि पुटकुळ्यामध्ये पु किंवा लसीका स्त्राव निर्माण करण्यास करणीभूत ठरतात.
रक्तमोक्षण हे शरीरातून दूषित रक्त बाहेर काढते. या साठी जलौका नामक एक प्राणी वापरला जातो जो विषारी दूषित रक्त शोषून घेऊन वारंवार होणार्या मुरुम आणि पुटकुळ्या निर्मिती वर आळा घालते. आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
मुरुम आणि पुटकुळ्या कमी करण्यासाठी योग्य आहार उपचार:
सुंदर आणि नितळ त्वचा असण्यासाठी उत्तम असा सकस आहार असणे आवश्यक आहे, त्यात विशेषतः सर्व ताजी फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. आणि सर्व आहार हा तुमच्या प्रकृती, अग्नि आणि वय यांचा संपूर्ण विचार करुन घ्यावा. यामध्ये तूप असणे तर आवश्यक आहेच.
अधिक माहितीसाठी आमचे पूर्वीचे पथ्यकर आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग १ ते ४ ही लेख मालिका आवर्जून वाचा।
- https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86/
- https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-2/
- https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-3/
- https://www.ayurvidhiclinic.com/%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86-4/
निष्कर्ष :
आयुर्वेद औषध उपचारांनी मुरुम आणि पुटकुळ्या यांना छानपणे घालवता येते. आयुर्वेद उपचार हे पुर्णपणे नैसर्गिक आणि उपद्रव रहित आहेत. त्यामुळे चिंतेची कुठलीही बाब नाही.
आम्ही आमच्या आयुर्विधी क्लिनिक मध्ये अनेक रुग्णांना मुरुम आणि पुटकुळ्या वर पृर्णपणे आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार देऊन बरे केले आहे.
आमचा पत्ता :
आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म केंद्र , ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर , पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047 .
Recent Comments