आम्लपित्त (एसिडिटी) : कारणे, लक्षणे आणि आयुर्वेद पंचकर्म उपचार

आसिडिटी किंवा आम्लपित्त ही आजच्या जगात बर्‍याच लोकांना भेडसावणारी एक सर्व सामान्य व्यथा झाली आहे. बरेच लोक वेगवेगळे घरघुती उपाय करतात किंवा पित्त कमी करणार्‍या गोळ्या (antacid) घेतात. पण त्याचा काही विशेष फरक दिसत नाही. पण हे गोळ्या खाऊन आम्लपित्त कमी करणे जर बर्‍याच काल पर्यन्त तसेच सुरु  राहिले तर मग त्याचे दुष्परिणाम मात्र कालांतराने दिसून येतात. आयुर्वेद मात्र आम्लपित्तकडे चिकित्सा दृष्टीने सर्व बाजूने वियचार करतो.  जसे त्याचे हेतु, आहार, विहार, आणि औषधोपचार. या लेखामध्ये आपण या सर्व बाबींना जाणून घेऊ या.

एसिडिटी आणि आयुर्वेदिकमत :

आम्लपित्त हे असिडिटी साठी केल्या जाणारे सर्व सामान्य निदान आहे. आम्लपित्त  या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आम्ल म्हणजे आंबट  रसाने युक्त किवा विकृत झालेले पित्त.  हे विकृत पित्त स्वतःच्या प्रकृत गुण आणि कर्मांचा त्याग केल्यामुळे विविध तक्रारी निर्माण करतात.

आम्लपित्ताची सामान्य लक्षणे :

  • पोटात आग किंवा जळजळ
  • छातीत आग किंवा जळजळ
  • अपचन
  • मळमळ
  • क्वचित उलटीचा त्रास होणे
  • डोक दुखणे
  • गरगल्या सारखे वाटणे

अम्लपित्ताचे उपद्रव :

आम्लपित्ताची उपेक्षा केल्यास  म्हणजे योग्यवेळी उपचार न केल्यास पुढील तक्रारी उद्भवू शकतात;

  • पोटाचे गंभीर आजार
  • पोटाचे अल्सर किंवा आताड्यांना छिद्र पडणे
  • हाड कमकुवत होणे
  • सांधे दुखी
  • डोक्यात कोंडा होणे
  • केस गळणे

अम्लपित्ताचे सामान्य हेतु (आयुर्वेद मते ):

खाण्याच्या चुकीच्या सवयी

वेळेवर जेवण न करणे

वेळ उलटून गेलयवर जेवण करणे (उशिरा जेवणे )

आंबट किंवा आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

मद्यपान

पोटात आम संचिती

मानसिक ताण आणि तनाव

उष्ण वातावरणमध्ये काम करणे इत्यादि

 

आम्लपित्त टाळण्यासाठी काही आयुर्वेद तिल सामान्य उपाय:

पथ्य किंवा आहारीय बदल :

 

  1. जेवणाच्या वेळा नियमित करणे : वेळेवर भुक लागल्यावर जेवण करणे हा अम्लपित्त टाळण्याचा उत्तम उपाय आहे. आम्लपित्ताचे मूळ हे जठराग्नीच्या वैषम्यतून असल्याकारणाने वेळेवर जेवण केल्याने वात प्रकोप कमी होते, तसेच पाचक रसांचे स्रवण योग्य रीतीने होण्यास मदत करते.
  2. अनारोग्यदायी पदार्थास आळा: अनारोग्यदायी  पदार्थ जसे  बाहेरचे चिप्स, पाकीट मध्ये मिळणारे इतर पदार्थ हे आम्लपित्त उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे सर्व पदार्थ आयुर्वेद अनुसार शिळ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. व त्यामुळे ते पचायला जड होऊन आम्लपित्ता उत्पन्न करतात. त्यामुळे ते टाळेलेच बरे.
  3. जेवणातील उष्मांक नियंत्रण : जास्त तेलकट किंवा जास्त तळेले पदार्थ शरीरात अजीर्ण निर्माण करून आम्लपित्त त्रास उत्पन्न करु शकतात.
  4. फलाहारचा स्विकार : आम्लपित्तामुळे होणार्‍या पोटात आग आणि जळजळ तसेच मळमळ ह्या साठी सकाळी नाश्तामध्ये विविध प्रकारचे ताजे फळ खाणे हे उत्तम उपाय आहे. टरबूज, खरबूज, डाळिंब, चिकू, सीताफळ, आवळा ही काही फळे आम्लपित्त शमन करण्यास उत्तम निवड आहे. ही सर्व फळ मधुर रस युक्त, पित्तास शमवणारी असून पोटाचे आरोग्य उत्तम प्रकारे जपणारी आहेत.
  5. अम्लपिता वाढवणार्‍य गोष्टींचा अस्विकार : आम्लपित्त वाढवणारी पदार्थ जसे आंबट, अंबवलेले, शिळे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, अति प्रमाणात चहा किवा कॉफी, मद्यपान आणि धुम्रपान हे कायमचे टाळावे.

आम्लपित्त टाळण्यासाठी काही सामान्य असे आयुर्वेदिक उपाय :

प्रत्येक व्यक्ति ही वेगवेगळे दोष आणि प्रकृती संगठन घेऊन जन्माला आलेली असते. त्यामुळे प्रत्येक रुग्ण जारी एक सारखे व्याधी लक्षण घेऊन रुग्णालयात आला तरी त्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे ही वेगळी असू शकतात. त्यामुळे वाचकांना ही विनंती की कृपया कुठेलेही औषधोपचार घेण्यापूर्वी तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

तरी काही सामान्य अशी सर्वांस लागू पडतील असे काही आयुव्रेदिक औषधे पुढील प्रमाणे आहे:

  • सकाळी अनुषापोटी अर्धा चमचा साधारण ३ ग्राम आवळा पावडर मधासह
  • धण्याचे पानी दिवसभरात थोडे थोडे पिणे
  • ज्येष्ठमध पावडर मधासह घेणे
  • अर्धा चमचा गुलकंद सकाळ संध्याकाळ
  • अर्धा चमचा मोरावळा सकाळ संध्याकाळ खाणे

आम्लपित्तामध्ये उपयुक्त असे पंचकर्म उपचार:

वमन आणि विरेचन हे आम्लपित्त व्याधीमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारे असे पंचकर्म उपचार आहे. आम्लपित्ताचे मुळ असणारा आम हा शरीरातून बाहेर काढून शरीर शुद्ध करते.

निष्कर्ष / सारांश :

आम्लपित्त व्याधीची चिकित्सा करतांना आयुर्वेद सर्वांगीण बाजूने विचार करतो. योग्य पथ्यकर आहार विहार आणि आयुर्वेदिक औषधोपचार सह पंचकर्माने आम्लपित्त मूळापासून बरं करण्यास मदत करते.   

प्रत्येक रुग्णांसाठी वैयक्तिक आयुर्वेदीय सल्ला आणि उपचार हे आयुर्वेदिक वैद्यांकडून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक वैद्य हे तुमचे नाडी, प्रकृती, दोष संगठन, आणि अवस्था यांचा पूर्ण तपासणी करुन तुम्हाला औषधे आणि पंचकर्म सुचवतात. आयुर्विधी क्लिनिक मध्ये रुग्ण आल्यावर त्याची सविस्तर लक्षणे समजून घेऊन योग्य ते निदान करुन चिकित्सा करतो. त्यमुळे तुमच्या आम्लपित्ताचे योग्य हेतु शोधून व्याधी योग्य निवारण करतो.

पत्ता : डॉ. कौस्तुभ बाठे, आयुर्विधी क्लिनिक – आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, ऑफिस नं 309, तिसरा मजला, पार्क प्लाझा बिझनेस सेंटर, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे 411047.

 

Read More

पथ्यकर आहार संल्पना आणि आयुर्वेद : भाग २

पथ्य आहार संकल्पना आणि आयुर्वेद : भाग २ 

मागील भागामद्धे आपण पोळी, वरण, भात यांबद्दल आपण सविस्तरपणे बघितलं. या भागात विविध फळ भाजी, पालेभाज्या त्यांच्या बनवण्याची साधारण कृती, विविध प्रकारच्या चटण्या  आणि त्यांचा पथ्य विचार बघूया .

भाजी:

दुधी भोपळा, पडवळ , भेंडी, दोडका,घोसाळे,गिलके, तोंडले,पांढरे वांगे,काकडी, नवलकोल, कोबी, फ्लॉवर, कोहळा, केळफुल,श्रवणघेवडा या भाज्या नित्य प्रकारे जेवणात घेऊ शकता.  

घेवडा, पावटा, शेवगा (शेवग्याची शेंग), गवार या भाजी सुद्धा बेताच्या प्रमाणात आहारात असू द्याव्या.

मग ह्याचं का असा पण प्रश्न येऊ शकतो. पहिले मुख्य कारण या सर्व भाज्या फळ भाजी या वर्गामध्ये मोडतात. वरील फळ भाज्या ह्या वनस्पतींना फळ स्वरुप उत्पन्न होतात. फळ सदृश असल्याने त्या त्रिदोष शामक, मल आणि मूत्र यांना अवरोध न करणार्‍या तसेच पचायला हलक्या असतात. अशा प्रकारे या सर्व भाज्या पथ्यकर  ठरतात.

भाजी बनवण्याची कृती:

भाजी करतांना त्यांना स्वच्छ धुवून चिरुन, साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी. गरम मसाला, विविध प्रकारच्या ग्रेवि यांचा वापर टाळावा.

पाले भाजी:

राजगिरा, साधा माठ, लाल माठ, चवळी, या भाजी चालतील. तसेच पालक, मेथी, शेपू इत्यादि भाजी कमी प्रमाणात चालतील.

वरील पैकी भाजी स्वच्छ धुवून, चिरुन , साजूक तूप किंवा तेल मध्ये  जिरे, मोहरी, आलं- लसूण घालून, हळद, मीठ आणि लाल तिखटची फोडणी घालून मंद आचेवर शिजू द्यावी.

असिडिटी, तसेच पोटात आग किंवा जळळ, घशात आंबट पानी किंवा पोटासंबंधी इतर कुठलेही आजार असताना टाळाव्या  किंवा  वैद्य सल्ल्यानुसार पालेभाजी आहारात समाविष्ट  कारव्या.

साधारण नियम:

भाजी करताना साधारण तूप किंवा तेलाची फोडणी द्यावी . हिरवी मिरची एवजी लाल तिखट कमी प्रमाणात घ्यावे. जास्त मसाले किंवा ग्रेवी, खूप सारण लावून किंवा हरभरा पीठ पेरून (बेसन लावून) भाज्या करु नये.

चटण्या:

साधारणपणे तीळ, जवस, खोबरे, शेंगदाणा किंवा कडीपत्ता  ह्यांपैकी कुठलीही एक कोरडी चटणी, जेवतांना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. प्रमाण एक किंवा दोन छोटे चमचे प्रमाणात घ्यावे. ज्या लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे दुखणे आहे त्यांनी वरील चटण्या जेवणात समाविष्ट कराव्यात.

*(पित्ताचा त्रास असणार्‍या लोकांनी शेंगदाणा चटणी टाळावी आणि तिखटाचे प्रमाण कमी ठेवावे.)*

अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या  ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..

Read More

पथ्यकर आहार संल्पना आणि आयुर्वेद : भाग १

कुठलाही व्याधी असताना किंवा व्याधी होऊ नये या भावनेने जर  तुम्ही कुठल्याही आयुर्वेद वैद्यकडे गेलात की ते तुम्हाला हमखास काही तर पथ्य आणि अपथ्य सांगतात. त्याच विषयी आपण या लेख मालिकेत बघणार आहोत. सर्वात आधी एक सामान्य लोकांमध्ये असणारा गैरसमज आज आपण पहिले बघू तो म्हणजे पथ्य आणि अपथ्य.

पथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालतील असे खाद्य पदार्थ
अपथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालणार नाही असे खाद्य पदार्थ

आता आपण पथ्य ही संकल्पना सविस्तर बघू या

पथ्य म्हणजे पथ किंवा मार्ग. मग हा मार्ग कोणता? असा आपल्याला प्रश्न पडणार . ज्या मार्गाने शरीरातील भाव पदार्थ अव्याहतपणे सर्व शरीरभर वहन होतात तो ! याला आयुर्वेदात स्रोतस असे म्हंटले जाते. म्हणजेच पथ्य हे शरीरातील भाव पदार्थ वहन करणार्‍या वाहिन्यांना यथा योग्य अशा स्तिथी मध्ये ठेवण्यास मदत करते किंवा त्यात अडथळा करत नाही. तर या उलट ते शरीरात अडथळा उत्पन्न करतात ते आहार घटक म्हणजे अपथ्य.

पथ्य संकल्पना ही देश, काल, प्रकृती, रुग्ण अवस्था, बल, सत्व, सत्म्य या सर्वांचा विचार करुन खूप विस्तृत अशी आहार पद्धती आहे. याच पथ्य संकल्पना संक्षिप्त आणि सर्व सामान्य अशा सामान्य पथ्य मध्ये बघूया.

पोळी / चपाती:

भारतीय आहाराचा सर्वात माहत्वाचा घटक म्हणजे पोळी किंवा चपाती. शक्यतोवर रोजच्या जेवणात गव्हाची पोळी असावी. त्याच गव्हाचा फुलका हा पचयाला पोळीपेक्षा हलका असतो. जर तुम्हाला मधुमेह किंवा डायबीटीस आहे किंवा वजन वाढायची काळजी वाटत असेल तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हा उत्तम असा पर्याय आहे. ज्वारीची आणि बाजरी मध्ये फायबर किंवा तंतुमय जास्त असून मधुमेह-अंक (glycemic index) हा पण कमी असतो .   आयुर्वेदानुसार गहू, बाजरी, ज्वारी हे उत्तम पौष्टिक पदार्थ असून  ते बल्य, हाडांना मजबतू करणारे आहे. आणि नित्या सेवानिय म्हणजे रोजच्या आहारात असावे असे पदार्थ आहे.

भात:

दुसर्‍या क्रमांकर आहे सर्वात विवादीत पदार्थ, तो म्हणजे भात. खायचा की नाही ? कोणी पूर्णतः बंद करावा, चाला बघुया. खरतर भात हा आद्य किंवा प्रमुख भारतीय पदार्थ. पण चुकीच्या बनवायच्या व खाण्याच्या पद्धतीमुळे भात हा विवादीत घटक झाला आहे. सगळ्यात आधी भाताबद्दल काही सामान्य नियम बघु. भातासाठी तांदूळ निवडतांना तो शक्यतोवर तुमच्या देश म्हणजे भौगोलिक राहत असणार्‍या शेत जमिनीत पिकलेला असावा.  म्हणजे  जर तुम्ही भारतात आणि त्यातल्या-त्यात  महाराष्ट्रात राहत असणार तर इंद्रायणी,आंबेमोहर, बासमती, कोलम, जिरं कोलम हे तांदूळ तुम्ही खायला वापरु शकता. तांदूळ वापरत आणताना तो शक्यतोवर एक वर्ष जुना असवा.

भात शिजवताना पातेल्यात पानी घालून करावा, कूकरचा  वापर करुन नये.  उपरोक्त पद्धतीने बनवलेला भात हा दुपारच्या जेवणात खावा, रात्रीच्या जेवणात शक्यतोवर खाऊ नये. वजन जास्त असणारे व मधुमेही रुग्णांनी हा नियम काटेकोरपणे  पळावा. आयुर्वेदानुसार वरील पद्धतीने तयार केलेला भात हा उत्तम बृहण म्हणजे शरीरातील धातुना बल देणारा, पचायला लघु किंवा  हलके, पथ्यकर स्निग्ध अशा गुणांचा असतो.

वरण (डाळ)  :

रोज च्या जेवणात पातळ असे मूग, तूर किवा मसूर या पैकी एक कुठले तरी वरण घेऊ शकता. घट्ट असे डाट वरण शक्यतोवर टाळावे. वरण हे साधे जास्त फोडणी घातलेले नसावे.  फोडणी घालायचीच असल्यास तूप, जिरे, कडीपत्ता आणि थोडं चिपुरते लसूण कळी घालू शकता.  फोडणीला गरम मसाला, टमटार , कांदा सहसा वापरु नये, त्यमुळे आम्लपित्त होण्याची डाट शक्यता असते .  

अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या  ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..

Read More