पावसाळा हा ऋतू सृष्टीसह मानवाच्या आरोग्यावरही प्रभाव टाकतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूसाठी विशिष्ट दिनचर्या व ऋतुचर्या सांगितलेली आहे. त्यानुसार, पावसाळा म्हणजेच वर्षा ऋतू हा बस्ती उपचारासाठी अत्यंत योग्य काळ मानला जातो. या ऋतूमध्ये वात दोष सर्वाधिक बिघडतो आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी “बस्ती” ही एक प्रभावी पंचकर्म चिकित्सा ठरते.
बस्ती म्हणजे काय?
बस्ती हा पंचकर्मातील एक अत्यंत प्रभावी व महत्वाचा उपचार आहे. यामध्ये औषधी तेल किंवा काढा गुदमार्गाने administer केला जातो. यामुळे शरीरातील दोष विशेषतः वातदोष शारीरातून बाहेर टाकला जातो. बस्तीला “अर्ध चिकित्सेचा राजा” असंही म्हटलं जातं, कारण हा उपचार अनेक आजारांवर उपयोगी ठरतो.
पावसाळ्यात वात दोष का वाढतो?
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असल्यामुळे आणि पचनशक्ती मंद झाल्यामुळे शरीरातील वात दोष असंतुलित होतो. त्यातून सांधेदुखी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अंगदुखी, थकवा अशा समस्या उद्भवतात. यासाठीच वात नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ती अत्यंत उपयुक्त आहे.
बस्ती उपचाराचे फायदे:
-
वात दोषाचे शमन – बस्ती वातदोषावर थेट काम करते.
-
सांधेदुखी व स्नायूंच्या वेदना कमी करणे – विशेषतः संधिवात, कटिवात यावर उत्तम प्रभाव.
-
पचनक्रियेचे संतुलन – अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यावर आराम मिळतो.
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवणे – नियमित बस्तीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
-
मनःशांती व झोपेत सुधारणा – वात समत्वात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्यही सुधारते.
-
त्वचा विकारांवर उपयोगी – वातदोषामुळे होणारे त्वचेचे विकार बस्तीमुळे कमी होतात.
बस्तीची प्रकार:
-
अनुवासन बस्ती – औषधी तेलाचा वापर करून दिली जाते.
-
निरूह बस्ती – औषधी काढ्याचा वापर करून दिली जाते.
कोणाला घ्यावी बस्ती उपचार?
-
वातविकार (Vaata Disorders) – संधिवात, कटिवात, गृध्रसी (सायटिका), अर्धांगवायू, स्नायूंचे आकुंचन, अंगधोप,इत्यादी.
-
सांधेदुखी व स्नायूदुखी – हाडे व सांधेमधील वातदोषामुळे होणाऱ्या वेदनांवर लाभदायक.
-
पचनसंस्था विकार – बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, अजीर्ण, मूळव्याध, पांडू.
-
स्त्रीरोग – मासिक पाळीचे विकार, गर्भधारणेतील अडचणी, गर्भाशय संबंधित समस्यांवर उपयोग.
-
त्वचारोग – वातप्रधान त्वचेचे विकार जसे की कोरडी त्वचा, खाज येणे, त्वचेला निपटपणा येणे.
-
मज्जासंस्था विकार (Neurological disorders) – पॅरालिसिस, पार्किन्सन, न्यूरोपॅथी, इत्यादी.
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी – शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी बस्ती उपयुक्त.
-
अवसाद व निद्रानाश – मानसिक ताण-तणाव, चिडचिड, झोप न येणे यावर उपयोग.
-
सौंदर्य व त्वचा निखरणे – वातारहित त्वचा, चमक वाढवण्यासाठी.
-
वारंवार सर्दी-खोकला व दम्याचे त्रास – वातकफविकारांवर बस्ती उपयुक्त.
-
वृद्धापकाळातील त्रास – वृद्धांमध्ये वात वाढल्याने होणारे विविध त्रास कमी करण्यासाठी.
-
सामान्य आरोग्य टिकवण्यासाठी – शरीरशुद्धी, वातसंतुलन आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी.
निष्कर्ष:
पावसाळा हा बस्ती उपचारासाठी सर्वोत्तम ऋतू आहे. वात दोषाचे शमन करून शरीरात नवचैतन्य निर्माण करण्याची ही एक आयुर्वेदीक संधी आहे. बस्ती उपचार तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा. योग्य प्रकारे घेतलेला बस्ती उपचार आपल्याला दीर्घकाळ आरोग्यदायी व उर्जावान ठेवतो.
“आरोग्य हेच खरे धन” – पावसाळ्यात बस्तीचा लाभ घ्या आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवा!
आपण हा उपचार घ्यायचा विचार करत असाल, तर आपल्या जवळच्या आयुर्वेदीय तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.