मागील दोन भागांमध्ये आपण कुठल्या भाज्या नियमित खाव्या त्यांचे पथ्य, बनवण्याची पद्धत या सर्व गोष्टी पाहिल्या. या लेखामध्ये आपण कडधान्य, पाणी, जेवणाच्या वेळा, जेवणाचे काही सामान्य नियम जे आपण नियमितपणे पाळावे ते बघणार आहोत.
कड धान्य :
राजमा, चणे , हरभरे , छोले , मटकी, वटणा हे सामान्यतः कमी प्रमाणात खावे. खाण्यास सांगितले असता मोड न आणता, शिजवून खावे. शिजवतांना त्यात अद्रक, लसूण, हिंग, कडीपत्ता आणि ओल्या नारळाचा खीस घालून शिजवून नंतर फोडणी देणे.
ज्यांना पोटा संबंधी त्रास आहे, गसेस आणि वात विकार किंवा त्रास असणार्या लोकांनी कडधान्य खाऊ नये.
मोड आलेली कडधान्य हे जरी अर्वाचीन मतानुसार प्रथिन युक्त उत्कृष्ट संगीतलेले असतील, मात्र आयुर्वेद मतानुसार ते त्रिदोष बिघडवणारे आहेत. (या बद्दल पुढे कधी तरी नवीन ब्लॉग मध्ये सविस्तर वर्णन करुया. अशा नवनवीन माहिती साथी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा @ayurvidhi_clinic)
जेवणाच्या वेळा : साधारणपणे आयुर्वेदानुसार भुकेची संवेदना झाली की जेवण करावं असे आहे. मात्र दिवसभरातील दोष स्थिति पाहता सकाळी १० ते १ च्या दरम्यान आणि संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान जेवणासाठी योग्य वेळ आहे.
जेवणाचे नियम : जेवणातांना टीव्ही, मोबाईल फोन वर बोलत किंवा गप्पा मारत जेवण करु नये . जेवण करतांना छोटे घास नीट व्यवस्थित चावून सावकाश जेवावे. हे छोटे बदल तुमच्या पोटाच्या आरोग्यात मोठे प्रभावी बदल घडवून आणण्यास मदत कर ठरु शकतात.
पाणी व त्याचे पथ्य:
शक्यतोवर पाणी हे उकळून गार करुन प्यावे. तहान लागल्यावर आवश्यक तेवढेच पाणी प्यावे उगाच वरचेवर पानी पिणे टाळावे. पाणी नेहमी बसून, ग्लासला ओठ लावून, घोट घोट प्यावे.
जेवणाच्या सुरुवातीस आणि जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. जेवतणा मध्ये मध्ये थोडे पाणी प्यावे जे जेवण जीरण्यास मदत करते.
पाणी हे नेहमी साधे किंवा मठातील प्यावे. फ्रीज व बर्फ टाकून पाणी पिणे टाळावे. थंडीच्या काळात कोमट किंवा साधे पाणी आणि उष्ण ऋतु मध्ये थंड पाणी (मठातील) प्यावे.
पथ्य मालिकेतील इतर पथ्य अपथ्य विचार पुढील भागात क्रमशः…
Recent Comments