कुठलाही व्याधी असताना किंवा व्याधी होऊ नये या भावनेने जर तुम्ही कुठल्याही आयुर्वेद वैद्यकडे गेलात की ते तुम्हाला हमखास काही तर पथ्य आणि अपथ्य सांगतात. त्याच विषयी आपण या लेख मालिकेत बघणार आहोत. सर्वात आधी एक सामान्य लोकांमध्ये असणारा गैरसमज आज आपण पहिले बघू तो म्हणजे पथ्य आणि अपथ्य.
पथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालतील असे खाद्य पदार्थ
अपथ्य : म्हणजे जे पदार्थ खायला चालणार नाही असे खाद्य पदार्थ
आता आपण पथ्य ही संकल्पना सविस्तर बघू या
पथ्य म्हणजे पथ किंवा मार्ग. मग हा मार्ग कोणता? असा आपल्याला प्रश्न पडणार . ज्या मार्गाने शरीरातील भाव पदार्थ अव्याहतपणे सर्व शरीरभर वहन होतात तो ! याला आयुर्वेदात स्रोतस असे म्हंटले जाते. म्हणजेच पथ्य हे शरीरातील भाव पदार्थ वहन करणार्या वाहिन्यांना यथा योग्य अशा स्तिथी मध्ये ठेवण्यास मदत करते किंवा त्यात अडथळा करत नाही. तर या उलट ते शरीरात अडथळा उत्पन्न करतात ते आहार घटक म्हणजे अपथ्य.
पथ्य संकल्पना ही देश, काल, प्रकृती, रुग्ण अवस्था, बल, सत्व, सत्म्य या सर्वांचा विचार करुन खूप विस्तृत अशी आहार पद्धती आहे. याच पथ्य संकल्पना संक्षिप्त आणि सर्व सामान्य अशा सामान्य पथ्य मध्ये बघूया.
पोळी / चपाती:
भारतीय आहाराचा सर्वात माहत्वाचा घटक म्हणजे पोळी किंवा चपाती. शक्यतोवर रोजच्या जेवणात गव्हाची पोळी असावी. त्याच गव्हाचा फुलका हा पचयाला पोळीपेक्षा हलका असतो. जर तुम्हाला मधुमेह किंवा डायबीटीस आहे किंवा वजन वाढायची काळजी वाटत असेल तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हा उत्तम असा पर्याय आहे. ज्वारीची आणि बाजरी मध्ये फायबर किंवा तंतुमय जास्त असून मधुमेह-अंक (glycemic index) हा पण कमी असतो . आयुर्वेदानुसार गहू, बाजरी, ज्वारी हे उत्तम पौष्टिक पदार्थ असून ते बल्य, हाडांना मजबतू करणारे आहे. आणि नित्या सेवानिय म्हणजे रोजच्या आहारात असावे असे पदार्थ आहे.
भात:
दुसर्या क्रमांकर आहे सर्वात विवादीत पदार्थ, तो म्हणजे भात. खायचा की नाही ? कोणी पूर्णतः बंद करावा, चाला बघुया. खरतर भात हा आद्य किंवा प्रमुख भारतीय पदार्थ. पण चुकीच्या बनवायच्या व खाण्याच्या पद्धतीमुळे भात हा विवादीत घटक झाला आहे. सगळ्यात आधी भाताबद्दल काही सामान्य नियम बघु. भातासाठी तांदूळ निवडतांना तो शक्यतोवर तुमच्या देश म्हणजे भौगोलिक राहत असणार्या शेत जमिनीत पिकलेला असावा. म्हणजे जर तुम्ही भारतात आणि त्यातल्या-त्यात महाराष्ट्रात राहत असणार तर इंद्रायणी,आंबेमोहर, बासमती, कोलम, जिरं कोलम हे तांदूळ तुम्ही खायला वापरु शकता. तांदूळ वापरत आणताना तो शक्यतोवर एक वर्ष जुना असवा.
भात शिजवताना पातेल्यात पानी घालून करावा, कूकरचा वापर करुन नये. उपरोक्त पद्धतीने बनवलेला भात हा दुपारच्या जेवणात खावा, रात्रीच्या जेवणात शक्यतोवर खाऊ नये. वजन जास्त असणारे व मधुमेही रुग्णांनी हा नियम काटेकोरपणे पळावा. आयुर्वेदानुसार वरील पद्धतीने तयार केलेला भात हा उत्तम बृहण म्हणजे शरीरातील धातुना बल देणारा, पचायला लघु किंवा हलके, पथ्यकर स्निग्ध अशा गुणांचा असतो.
वरण (डाळ) :
रोज च्या जेवणात पातळ असे मूग, तूर किवा मसूर या पैकी एक कुठले तरी वरण घेऊ शकता. घट्ट असे डाट वरण शक्यतोवर टाळावे. वरण हे साधे जास्त फोडणी घातलेले नसावे. फोडणी घालायचीच असल्यास तूप, जिरे, कडीपत्ता आणि थोडं चिपुरते लसूण कळी घालू शकता. फोडणीला गरम मसाला, टमटार , कांदा सहसा वापरु नये, त्यमुळे आम्लपित्त होण्याची डाट शक्यता असते .
अशा प्रकारे या लेख मालिकेतील भागात आपण काही महत्वाचे पदार्थ बघितले.जेवणाच्या ताटातील इतर पदार्थ क्रमशः ………..
Recent Comments