आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. मराठी आणि हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. असं म्हटल्या जाते की आजच्या दिवसशी ब्रह्म देवांनी सृष्टी उत्पत्ति केली होती आणि आजच्या शलिवाहनांनी शकांवर विजय मिळवला होता. आज आपण गुढी उभारुन त्याची ब्रह्मध्वज म्हणून पुजा करतो आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो.
पण याचे अजून देखील खूप मोठे महत्व आयुर्वेद शास्त्रात आहे. वाग्भट संहितेनुसार चैत्र आणि वैशाख हे दोन महीने वसंत ऋतुचे असतात असे संगितले आहे. त्यामुळे ढोबळ मनाने जर बघायला गेले तर आज पासून वसंत ऋतुची सुरुवात होते.
ऋतुसंबंध आणि आयुर्वेद :
वसंत ऋतु हा इतर ऋतु प्रमाणे शरीरात वेगवेगळे बदल घडवून आणतो. वसंत ऋतूमध्ये शिशिर ऋतूमध्ये साठलेला कफ दोष हा उन्हाच्या उष्णतेने वितळायला सुरुवात होते . त्यामुळे या काळात विविध कफचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी त्या विकृत कफाचे निर्हरन करण्यासाठी या ऋतुमध्ये वासंतिक वमन हे केले जाते.
गुढी पाडवा आणि आयुर्वेद संबंध :
पण हे सर्व झाले ते वसंत ऋतु आणि आयुर्वेदाबद्दल, त्यात आजच्या म्हणजे गुढी पाडव्याचा काय संबंध?? सांगतो!! आज गुढी उभारतांना काय काय वस्तु लागतात?
वेताची काठी, नवीन वस्त्र, चफ्यांच्या फुलांची माळ , साखरेची माळ किंवा गाठी, कडू निंबपाला, आंब्याची पाने आणि तांब्याचा गडवा किंवा लोटा. याचा आयुर्वेदाशी कसा संबंध ते बघूया..
वेताची काठी : ही वंश म्हणजेच बांबु सारखी दिसणारी पण नारळाच्या वर्गातील वनस्पति आहे. हिला बुंध्यावरती काटे असून लांब थोडे अरुंद असे पान असतात. ही वनस्पति भरीव असून स्वरक्षणासाठी वापरीली जाते.
चाफा : ही वनस्पति कफ शामक, पित्त शामक आणि वात शामक एकूण त्रिदोष शामक आहे. तसेच याचे विशेष प्रभाव रक्त धातुवर आहे. त्यामुळे ही दाह म्हणजे आग कमी करणारी आहे.
साखरेची माळ: साखर ही मधुर रस म्हणजे चवीला गोड, विपाक म्हणजे पचल्यवर गोड स्वरूप होणारी आणि तिचा वीर्य कार्य शक्ति ही शीत म्हणजे थंड आहे. गूळ हा साधारण साखरेच्या तुलनेत गरम असतो. त्यामुळे यापुढे उन्हाळयात गुळाएवजी साखर वापरली जाते.
निंब पाला : निंब ही कडू रस आणि शीत वीर्य अशी वनस्पति आहे. निंबाचा कोवळा पाला हा किंचित कडू आणि तुरट रस असतो. त्यामुळे तो कफ शामक आणि उष्णतेपासून संरक्षण करणारा आहे. तसेच कृमी म्हणजे जंत, जखम यांना भरुन काढणारा, दाह म्हणजे शरीराची आग कमी करणारा, विविध त्वचा विकारांवर उपयोगी असा आहे.
आंब्याची पाने : आंब्याची पाने ही मंगल कारक आणि शुभ मानली जातात. अंबायची पाने ही व्रणरोपक म्हणजे जखम भरुन आणणारे आणि रक्त धातुवर कार्य करणारे आहे. तसेच कोवळे आंब्याची पाने ही स्तंभक म्हणजे शरीरातून अतिरिक्त प्रमाणात बाहेर पडणार्या द्रव्यांना थांबवतात. याचा उपयोग फांट स्वरुपात औषद्धांमध्ये केला जातो.
निष्कर्ष :
अशा प्रकारे हे सर्व द्रव्य आयुर्वेद वनस्पति उपयोगी असून येणारा ऋतु क्रमामध्ये वापरली जाते. त्यामुळे त्यांचा उपयोग हा विविध सण उत्सवात वापरुन त्यांचे महत्व जपले जाते.
Recent Comments